News

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ या संस्थेला सर्वोतपरी मदत करणार : मंत्री मंगलप्रभात लोढा

गेली ६९ वर्ष मध्य मुंबईत विद्यार्थ्यांसाठी कार्य करीत असलेल्या या संस्थेस भविष्यात शासनाकडून काही मदत लागल्यास सर्वोतपरी करीन असे आश्वासन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. मंडळाच्या चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, ना. म. जोशी मार्ग आणि लालबाग या पाच विभागात स्वतःच्या मालकीच्या अभ्यासिकेची गरज आहे त्या संदर्भात आपण प्रयत्न करू असे ही मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.