मंडळ परिचय
स्थापना : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली सात शाळकरी विद्यार्थ्यांनी केली.
दृष्टिकोन : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हा व्यापक विचार संस्थेने अंगिकारला आहे.
ध्येयधोरण : सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे.
कार्यक्षेत्र : मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणारया चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, लालबाग व ना.म.जोशी या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
सदस्यत्व : इयत्ता ५ वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास संस्थेचा सभासद होता येते. केवळ एक रुपयात आजीव सभासदत्व देणारी ही एकमेव संस्था. कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यास सभासद होण्याची मुभा आहे.
सदस्य परिवार : आजमितीस संस्थेचे १४,००० हून अधिक सभासद आहेत. यापैकी अनेक जण पदवीधर, उच्चशिक्षित असून डॉक्टर, प्राध्यापक, वकील अभियंते, पत्रकार, कला वा क्रीडा इत्यादि क्षेत्रात कार्यरत आहेत.
अधिक...
आगामी कार्यक्रम
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई संचालित व्यवसाय मार्गदर्शन केंद्र Let’s Plan The Future, Let’s Create The Career आयोजित “माझी करिअरची दिशा” (फक्त दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता)

दहावीच्या परीक्षा संपल्या. काही प्रवेश परीक्षा सोडल्या तर बारावीच्या विद्यार्थ्यांच्याही परीक्षा संपल्यातच जमा आहे. त्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी नक्कीच वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर आता मस्तपैकी सुट्टीचा मनसोक्त आनंद घेत असणार. आणि त्यांनी तो घेतलाच पाहिजे. पण खरं तर आता दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कसोटीचा काळ. नेहमीची शाळा-कॉलेज सोडून आपल्या भावी आयुष्यातील करिअरच्या दृष्टीने नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागणार. मला भविष्यात काय व्हायचं? आपले आवडीचं क्षेत्र कोणतं? त्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणं गरजेचं आहे? या सर्व प्रश्नांची काही उत्तरे परीक्षेच्या निकालानंतर शोधण्यापेक्षा या सुट्टीतचं शोधली तर निकालानंतर नवीन प्रवेशाच्या दृष्टीने जास्त त्रास राहणार नाही. म्हणूनच *विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई* संचालित *व्यवसाय मार्गदर्शन केंद्र* यांनी *"माझी करिअरची दिशा"* हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दहावी व बारावीच्या मुलांची *'करिअर दिशा चाचणी'* घेण्यात येणार असून त्यासोबत *'करिअर निवड - एक आव्हान'* या विषयावर मार्गदर्शनपर सत्र घेतले जाईल. एवढेच नाही तर गरजू विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीद्वारे देखील मार्गदर्शन केले जाईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर (https://goo.gl/z2323P) जाऊन किंवा आमच्या ग्रंथालयात येऊन बुधवार, दिनांक २५ एप्रिल २०१८ पर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. *"माझी करिअरची दिशा" - कार्यक्रम रूपरेषा* १. दिनांक २५/०४/१८ पर्यंत – *“माहिती अर्ज भरणे.”* (Online अर्जाकरिता - https://goo.gl/z2323P या लिंकवर जाऊन किंवा Offline अर्ज ग्रंथालयात येऊन अर्ज भरणे.) २. दिनांक २८/०४/१८ (दिलेल्या वेळेनुसार) पर्यंत – *“करिअर दिशा चाचणी देणे.”* ३. सोमवार, दिनांक ३०/०४/१८, सायंकाळी ७.०० वाजता. – *“करिअर निवड - एक आव्हान”* (मार्गदर्शनपर व्याख्यान) *स्थळ:* विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई संचालित समर्थ ग्रंथालय, अब्दुल्ला ब्रेलव्ही उद्यान, ना. म. जोशी मार्ग, चिंचपोकळी स्टेशन जवळ, चिंचपोकळी (प.), मुंबई - ४०००११. *नाव नोंदणी व अधिक माहितीकरिता संपर्क:* 8082441488, 8425992997. आपले विनीत नितीन झोडगे - मंडळ प्रमुख सागर बोने – व्यवसाय मार्गदर्शन व नोकरी संदर्भ केंद्र प्रमुख किशोर पोळ – सहाय्यक व्यवसाय मार्गदर्शन व नोकरी संदर्भ केंद्र प्रमुख
___________________________________

माहिती पट